प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे – दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या साकेत येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे मोठ्या दिमाखाने पार पडला. सदर वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व ठाणे जिल्हाचे पालकमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

भारतातील उत्तर पूर्व राज्यांमधुन मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच तरूण हे शिक्षण, व्यवसाय, नोकरी/करियरच्या दृष्ट्रीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वास्तव्यास येतात. हे सर्व नागरिक आपल्या कुंटूबापासून व मुळ गावापासून दूर राहत असल्याने एखादा छोटासा नकारात्मक अनुभव किंवा किरकोळ गैरसमजही त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकतो. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सदर नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने उत्तर-पूर्व भारतातील विविध राज्यांमधुन ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात राहत असलेल्या विद्यार्थी, नोकरदार तसेच व्यावसायिक यांच्याशी संपर्क साधुन त्यांना सदर प्रजासत्ताकदिनी साकेत पोलीस मैदान येथे ध्वजारोहन कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमानंतर त्यांची कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेशी परिचय करून दिल्यानंतर त्यांच्याशी मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, मा.डॉ. श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनौपचारिक संवाद साधुन त्यांना सायबर काईम, आर्थिक गुन्हे, महिला अत्याचार गुन्हे व ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सोशल मिडीया चॅनेल्स तसेच आपतकालीन हेल्पलाईन क्रमांक याबाबत माहिती देवून मार्गदर्शन केले व ठाणे पोलीस त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याबाबत आश्वासित करण्यात आले. अनौपचारिक संवादाच्या वेळेस उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थी तसेच नागरिकांचे प्रतिनीधी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये त्यांना कोणत्याही अनुचित प्रकारांना सामोरे जाण्याची वेळ येत नाही तसेच ठाणे शहरामंध्ये अत्यंत सुरक्षित वाटते अशा भावना व्यक्त केल्या. तसेच ठाणे पोलीसांनी हा एक अत्यंत चांगला उपक्रम राबविल्याबद्दल पोलीसांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास उत्तर-पूर्व भारतातील २७ स्त्री/पुरुष नागरिक हजर होते.

याचप्रमाणे पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण अंतर्गत परिमंडळ-३, कल्याण व परिमंडळ-४, उल्हासनगर या परिसरात राहणाऱ्या २६ स्त्री/पुरुष उत्तर-पूर्व भारतीय नागरिकांना कल्याण येथे ध्वजारोहण कार्यक्रमास आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. ठाणे पोलीसांच्या या स्तुत्य उपक्रमाब‌द्दल समाजातील सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.