प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दिनांक ०१/०२/२०२६ रोजी रात्री २२:०० वा चे सुमारास एक इसम ‘हेरॉईन’ हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता गायमुख, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) जि. ठाणे येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी खंडणी विरोधी पथकाचे पोहवा. आशिष ठाकुर यांना मिळाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे सपोनि. तारमळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात येवुन सदर पथकाने सापळा लावुन सुमारे २२:४५ वा गायमुख, घोडबंदर रोड, ठाणे प. येथे इसम नामे फरदीन गुलजार मुल्ला (वय: ५० वर्षे), काम रिक्षा चालक, राहणार: ३०४, मुल्ला हाऊस, नवायत मोहल्ला, बाजारपेठ, सोपारागांव, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एकूण २ किलो २८८ ग्रॅम वजनाचा (रूपये ६ कोटी ८६ लाख रूपये किंमतीचा) ‘हेरॉईन’ अंमलीपदार्थ मिळून आला. सदर इसमाविरूद्ध कासारवडवली पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ९७/२०२६ एन.डी.पी.एस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (क) अन्वये नोंद करण्यात आला असून नमुद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुनिल तारमळे हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश साळवी, सपोनि. सुनिल तारमळे, संदिप भोसले, पोहवा. आशिष ठाकुर, अभिजीत गायकवाड, भगवान हिवरे, पोना. सुमित मधाळे यांनी केली आहे.

पोलिसांतर्फे आवाहन

अंमली पदार्थ विकी, साठवणुक, वाहतुक, सेवन करणे हा अपराध असुन यामध्ये सहभागी असलेले इसमांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे येथे द्यावी. माहिती देणारे इसमांची नांवे गुप्त ठेवली जातील असे सांगण्यात आले आहे.