विजय राठोड
➡️ तक्रारदार यांची रुपये 01,00,000/- पैकी रुपये 66,571/- फसवणुक केलेली रक्कम तक्रादार यांना परत मिळवुन देण्यात दहिसर पोलीस ठाणेची उत्कृष्ठ कामगिरी….
➡️ घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, तक्रदार नामे मिलिंद सूर्यकांत मोरे, वय. 30 वर्षे, धंदा. नोकरी, रा.ठी. UG 004 जय बजरंग SRA बिल्डिंग, हनुमान टेकडी, काजुपाडा, बोरिवली पूर्व, मुंबई 400066 हे दिनांक 08/01/2024 रोजी इंस्टाग्राम वर रिल्स बघत असताना षेअर मार्केटच्याबाबत एक जाहिरात दिसली असता सदरच्या एका लिंक वर क्लिक केल्या वर तक्रारदार यांना एका इन्वेस्टर अलायन्स नावाच्या व्हॉट्स अप ग्रुप वर जॉईन करण्यात आले. त्यानंतर ग्रुप च्या OWNER चा नाव आर्यन रेड्डी ,आणि त्याची असिस्टन्ट चे नाव प्रियांका ओबेरॉय असे होते. तिचा तक्रारदार यांना प्राइवेट मेसेज आला आणि तक्रारदार यांना सांगण्यात आले कि तुम्ही आमच्या सॉफ्टवेअर सोबत ट्रेडिग केली तर आम्ही रोजचे 4% रिटर्न देऊ. त्यानुसार तुम्ही रू. 50,000/- पाठवा असे सांगीतले. म्हणुन तक्रारदार यांनी दिनांक 16/01/2024 रोजी दुपारी 01ः26 वाजता तक्रारदार यांच्या सारस्वत को. ऑ. बॅकेच्या 350203100003998 या खात्यातुन 50,000 रुपये फसवणुकदाराच्या पंजाब नॅषनल बॅकेच्या 4003002100007485 या खात्यामध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांनी ट्रेडिंग सुरवात केली. पण त्यांनंतर काही दिवसांनी फसवणुकदाराने तक्रारदार यांना पुन्हा अजून पैसे जमा करायला सांगितलं जेणे करून जास्त रिटर्न मिळेल. दिनांक 24/01/2024 रोजी तक्रारदार यांनी परत वरीलप्रमाणे 50,000/- रुपये तक्रारदार यांच्या सारस्वत को. ऑ. बॅकेच्या 350203100003998 या खात्यातुन फसवणुकदाराच्या पंजाब नॅषनल बॅकेच्या 4003002100007485 या खात्यामध्ये ट्रान्सफर केले. त्या दरम्यान तक्रारदार यांना दोन वेळा 3800 रुपये रिफंड मिळाले. पण त्यानंतर तक्रारदार यांनी खूप वेळा रिफंड मिळण्यासाठी प्रयत्न केले पण ते लोक तक्रारदार यांची रिफंड विनंती रिजेक्ट करत होते. दिनांक 07/02/2024 तक्रारदार यांनी त्यांचा कडे माझे पैसे परत करण्यात यावे अशी विनंती केली असता त्यांनी सांगितलं कि जर पैसे परत पाहिजे असतील तर अजून 40,000 रुपये डिपॉईट करा. सदर प्रकार लक्षात घेता तक्रारदार यांना त्यांची रू. 01,00,000/- ची आर्थिक फसवणुक झाल्याचे समजले. तक्रारदार तात्काळ दहिसर पोलीस ठाणे येथील सायबर सेल येथे हजर होताच पोउनि राजेश गुहाडे यांचेकडे तक्रार केली असता तक्रारदार यांच्या गेलेली रक्कम चा शोध घेऊन तक्रारदार यांची रक्कम ही इंडस्टंड बॅकेमध्ये रू. 50,000/-, अॅक्सिस बॅकमध्ये रू.5000/-, स्टेट बॅकेमध्ये रू.5101/- व रू. 470/- असे येथे गेल्याचे समजले त्यानुसार पोउनि गुहाडे यांनी सदर बँकेच्या नोडलशी प्रथमतः कॉलद्वारे व नंतर मेल द्वारे संपर्क करून सदर अकाउंट फ्रिज करण्याबाबत सांगितले व फॉलोअप घेऊन तक्रारदार यांची आर्थिक फसवणूक झालेले रुपये 01,00,000/- मधील रूपये 60,571/- तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात यश आले आहे.
सदर कामगिरी स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 12, किशोर गायके सहाय्यक पोलीस आयुक्त, दहिसर विभाग, अविनाश पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाने सायबर अधिकारी राजेश गुहाडे, पोलीस उपनिरीक्षक, पोशि नितीन चव्हाण व मपोशी सुप्रिया कुराडे सायबर सेल यांनी सदर रकमेचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तक्रारदार यांना त्यांची आर्थिक फसवणूक झालेली रक्कम परत केली आहे.
➡️ ऑनलाईन फसवणुक झालेली रक्कम रू. 01,00,000/-
➡️ परत मिळवुण दिलेली रक्कम रू. 60,571/-
➡️ सायबर पथक -ः
पोउनि राजेश गुहाडे
पोशी नितीन चव्हाण
मपोशी सुप्रिया कुराडे
वरिठ पोलीस निरीक्षक,
दहिसर पोलीस ठाणे, मुंबई.