संदिप कसालकर (मुख्य संपादक)
अखेरीस अडीज महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जोगेश्वरीतील मेघवाडी पोलीस ठाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उमेश मच्छिंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईसह महाराष्ट्रातील बऱ्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्या मध्ये मेघवाडी पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असणारे राजेंद्र मांढरे यांचीही सहायक पोलिस आयुक्त म्हणून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. त्या नंतर सलग अडीज महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मेघवाडी पोलीस ठाण्यात उमेश मच्छिंद्र हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. या अडीज महिन्यांच्या कालावधीत मेघवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय साळुंके हे प्रभारी म्हणून पोलीस ठाण्याचे कामकाज पाहत होते. दरम्यान उमेश मच्छिंद्र यांच्या येण्यानं मेघवाडी पोलीस पथकामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं. परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनीही मच्छिंद्र यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान नेहमीच आपली स्थानिक जनता यांच्या रक्षणाप्रति कटिबद्ध राहून आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्या येण्यानं स्थानिक रहिवाश्यांमध्ये सुद्धा हर्षोउल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले.