प्रतिनिधी: अजित जाधव
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देत दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
❗ काय होता वाद:
मतमोजणीदरम्यान फेरफार झाल्याचा आरोप कीर्तीकर यांनी केला होता. त्यांनी दावा केला की EVM मतमोजणीत ते एका मताने आघाडीवर होते, परंतु पोस्टल मतांची मोजणी होताच वायकर 48 मतांनी विजयी ठरले.
⚖️ न्यायालयाचा निर्णय:
न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने निवडणूक याचिकेवर सुनावणी करताना वायकर यांच्या विजयाला मान्यता दिली. मतमोजणीतील प्रक्रियेत कोणताही फेरफार झाल्याचा पुरावा न सापडल्याने ही याचिका फेटाळण्यात आली.
📊 अंतिम निकाल:
➡️ रवींद्र वायकर: 4,52,644 मते
➡️ अमोल कीर्तीकर: 4,52,596 मते
👉 राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.