काही तासांतच पैसे पुनःप्राप्त करण्यात दहिसर पोलिसांना यश
भक्ती दवे
अशी करण्यात आली फसवणूक
अभय नवीनचंद्र कामानी हे दहिसर येथील रहिवासी दिनांक 31/10/2023 रोजीचे 12.00 वा. च्या दरम्यान त्यांच्या दोन मुलींना मेरी मॅक्युलेट हायस्कूल बोरवली पश्चिम येथे शाळेत सोडून येत असताना त्यांना सुमारे 12:09 वाजताच्या सुमारास मोबाईल वर आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्ड व्हिडिओ केवायसी अपडेट करण्यासाठी एक संदेश प्राप्त झाला होता तो अभय यांनी उघडून पाहिला त्यांना त्यामध्ये एक लिंक दिसली त्यावर क्लिक करत असताना त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला तो त्यांनी उचलला असता ‘मी आयसीआयसीआय या बँकेकडून बोलत आहे, तुमचे केवायसी अपडेट करायचा आहे तुमच्या मोबाईलवर जो संदेश प्राप्त झाला त्यावर जाऊन क्लिक करा’ असे सांगितले असता अभय यांनी नमूद संदेश मधील लिंक वर क्लिक केले असता त्यांच्या मोबाईल क्रमांक वर एका पाठीमागे एक असे 05 ते 10 ओटीपी संदेश प्राप्त झाले त्यानंतर थोड्या वेळात तक्रारदार यांच्या मोबाईलवर 65,490 रू तक्रारदार यांच्या क्रेडिट कार्ड मधून कट झाल्याचा संदेश प्राप्त झाला. नंतर एका पाठीमागे एक असे 19,560 रू , 84,145 रू , 49,999रू 83,997रू असे एकूण 3,03,194 रू तक्रारदार यांच्या क्रेडिट कार्ड मधून कपात झाले. अभय यांना वरील रक्कम डेबिट झाल्याचा संदेश मिळताच, स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता, त्यांनी तात्काळ दहिसर पोलीस ठाणे येथील सायबर् सेल येथे हजेरी लावली.
1) REALME MOBILE 83,997 रू ,
2) ONE PLUS 49, 999 रू
3) INFINITY RETAIL 65,490 रू ,
4) MOBIKWIK 19, 560 रू ,
5) OPPO MOBILES 84,148 रू
पोलिसांच्या कारवाईचा तपशील
पोलीस उपनिरीक्षक गुहाडे यांचेकडे तक्रार केली असता, अभय यांची गेलेली रक्कमचा शोध घेतला असता त्यांची रक्कम ही वरील नमूद ठिकाणी गेल्याचे समजताच PSI गुहाडे यांनी वरील कंपनीच्या नोडल अधिकारी यांना मैलद्वारे व मोबाईलवर संपर्क करून फॉलोअप घेऊन अभय यांचे रुपये 03,03,194 /- त्यांना परत मिळवून देण्यात आले आहेत.
यशस्वी कामगिरी
सदर कामगिरी स्मिता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 12 , किशोर गायके सहाय्यक पोलीस आयुक्त,दहिसर विभाग,दहिसर , प्रवीण पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दहिसर पोलीस ठाणे , दिवसपाळी पोलीस निरीक्षक राम पोटे यांच्या मार्गदर्शनाने PSI राजेश गुहाडे,पोलीस उपनिरीक्षक (सायबर सेल) यांनी सदर रकमेचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तक्रारदार यांना परत केली आहे.