शेलगाव येथे घराच्या गच्चीवरून दोन राऊंड फायर

रोहित कांबळे
बदनापूर तालुक्यातील राजेवाडीतील एका जणाकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून जालना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून त्या युवकाला गावठी कट्यासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता गावठी कट्टा विकणार्या व मध्यस्थी करणार्या टोळीपर्यंत पोलिस पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एक जण फरार असल्याची माहिती मिळाली. शेलगाव येथील राहत्या घराच्या गच्चीवरून दोन राऊंड फायर केले असल्याची धक्कादायक माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिस या गावठी कट्ट्याच्या टोळीचे व पाळेमुळे खणून काढत आहेत.

सुभाष विनायक डोलारे (रा. राजेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना), अमोल राजेंद्र देशमुख (रा. शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना), सोनु संतोष जाधव (रा. नूतन वसाहत, जालना), आकाश उर्फ भाऊ कल्याण जाधव (फरार) (रा. कांबळेगल्ली, संभाजीनगर, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.