कल्याण पोलीसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी: अवधुत सावंत
संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचे आरोपी सुमित संजय लोध व त्याचा साथीदार प्रेम एकनाथ शिंदे यांनी आपसात संगनमत करून अपहरण केले होते, त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीवर आरोपी सुमित संजय लोध याने त्याचा साथीदार आरोपी प्रेम एकनाथ शिंदे याच्या मदतीने जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केला होता.

Advertise
Advertise

याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ०७/२०२३ भादंवि कलम ३६३. ३६६, ३७६ (२)(जे)(एन), ३७६ (३), १०९ सह लै.अ.बा. संरक्षण कायदा कलम ४, ६, ९ (एल)/१० प्रमाणे दि. २२/०१/२०२३ रोजी दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हा दाखल असल्या पासून गुन्ह्यातील आरोपी प्रेम एकनाथ शिंदे हा फरार झाला होता व तो सापडत नव्हता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण चे पोलीस करत असताना दि. १८/१०/२०२३ रोजी पो.ना. सचिन वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण च्या पथकाने सापळा रचुन उंबर्ली रोड, मानपाडा, डोंबिवली पूर्व येथून गुन्ह्यातील हवा असलेला फरार आरोपी प्रेम एकनाथ शिंदे (वय: २१ वर्षे) रा. मंदाधाम चाळ, रूम नं. ०७, साईधारा टॉवर समोर, गोवर्धन पाटील यांच्या ऑफीसच्या मागे, उंबर्ली रोड, मानपाडा, डोंबिवली पूर्व यास गुन्हा घडून दाखल झाल्यानंतर आठ महिन्यांनी शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी संगमेश्वर पोलीस ठाणे, जिल्हा रत्नागिरी येथील पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, मा.सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पो.हवा. अनुप कामत, विश्वास माने, बापूराव जाधव, पो.ना. सचिन वानखेडे, पो.कॉ. विनोद चन्ने, पो. कॉ. विजेंद्र नवसारे यांनी यशस्वीपणे केली आहे.