एस.डी चौगुले

नाशिक शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न लागणार मार्गी !

मा.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम २च दिवसांत म्हसरूळ पोलीस ठाणेतील बेवारस व गुन्हयांतील ७३वाहनांचा लावला शोध गंगामाता वाहन शोध संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे.शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याचा आवारात शेकडो बेवारस वाहने अक्षरशा धुळ खात पडलेली आहेत या वाहनाचे मालक सापडत नसल्याने पोलीसांच्या दृष्टीने ही बेवारस वाहने म्हणजेच मोठीच डोकेदुखी झाली आहे. या वाहनाची विल्हेवाट लावण्याची प्रकीया किचकट असल्याने वर्षानुवर्ष पडीक असलेली ही वाहने सांभाळण्याची जबाबदारी पोलीसांवर आली आहे.मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी यातुन मार्ग शोधुन काढला आहे.

नाशिक शहर पोलीस • व गंगामाता वाहन शोध संस्था, अध्यक्ष राम उदावंत यांचे मदतीने म्हसरूळ पोलीस ठाण्यातील बेवारस मालकाचा शोध घेउन ही वाहने परत केली जाणार असल्याने नाशिक शहर आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

बरेचदा चोरलेल्या वाहनांचे हवे असलेले काही भाग काढुन घेउन अशी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून चोरटे पसार होतात. काही घटनांमध्ये चोरटे अशा वाहनांचा वापर गुन्हा करण्यासाठी वापरतात बेवारस किंवा अपघातग्रस्त वाहने ही पोलीस नजीकच्या पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करून ठेवतात. त्यामुळे पोलीस ठाण्याला अक्षरशा भंगार बाजाराचे स्वरूप आल्याने बकालपणा दिसुन येतो. सदरचे वाहने वर्षानुवर्ष पोलीस ठाण्याचे आवारात धुळ खात पडुन असल्याने आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणुन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेत गंगामाता वाहन शोध संस्था, तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे यांना पाचारन करण्यात आले व त्यांचे मदतीने बेवारस मालकाचा शोध घेत ती वाहने मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश म्हसरूळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना दिले. मा. पोलीस उपआयुक्त (परीमंडळ ०१) चे किरणकुमार चव्हाण व मा. पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) चंद्रकांत खांडवी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) नितीन जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, पोउपनि विठ्ठल माळी, पोउपनि रमेश घडवजे यांनी पुढाकार घेउन मुद्देमाल कारकुन वाल्मीक खैरनार, पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, महिला पोलीस अंमलदार राजश्री दिघोळे पोलीस नाईक नितीन लिलके व गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपअध्यक्ष बाबासाहेब बागडे अशांनी बेवारस वाहनांचे मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. म्हसरूळ पोलीस ठाणे येथे वाहने बेवारस अपघात व पोलीसांनी गुन्हयात जप्त असलेल्या वाहन मालकांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तरी वाहन मालकाने आपले वाहन पत्र मिळताच ८ दिवसाचे आत घेउन जावेत वाहने न नेल्यास कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करून वाहनांचा लिलाव करून आलेली रक्कम शासन भरणा करण्यात येईल.

तरी वाहन मालकांनी म्हसरूळ पोलीसठाण्याशी लवकर संपर्क करावा असे आवाहन वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.