गणेश मुथुस्वामी

दि. ०२.०१.२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली पथकाने बोरीवली पश्चिम, मुंबई परिसरात दोन इसमांना अंमली पदार्थ विरोधी कारवाई दरम्यान अटक केली. सदर आरोपींजवळ अंदाजे रु. १.१८ करोड पेक्षा जास्त किंमतीचा एकूण २ किलो ९६० ग्रॅम ‘चरस’ हा अंमली पदार्थ सापडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने २०२३ मध्ये चरस अंमली पदार्थ जप्त केल्याबाबत एकूण ११ गुन्हे दाखल करून त्यामध्ये २९ तस्करांना जेर बंद करून एकूण ११.४४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतींचा चरस जप्त केला आहे.