सलाहुद्दीन शेख
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मियालचे उपकंत्राटदार बी.व्ही.जी. इंडिया लि. च्या कामगारांची तीन वर्षांकरिता ५०००/- रुपयांची पगारवाढ करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी केंद्रीय मंत्री, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार, अरविंद सावंत, कार्याध्यक्ष,अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व संयुक्त सरचिटणीस ,संजय शंकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली.
त्याचबरोबर कामगारांना इतरही लाभ मिळणार आहेत. सदर करारावर मियाल व्यवस्थापनाकडून व्ही. पी. (एच. आर.) श्रीकांत पवार, ई. आर.- जी. एम. राजेश म्हात्रे, बी.व्ही.जी. व्यवस्थापनातर्फे विपिन टिकू, योगेशा राव, उत्तम उडान टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे निशिद मष्रू यांनी सह्या केल्या.
यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, योगेश आवळे, पोपट बेदरकर
सहचिटणीस मिलिंद तावडे, जगदीश निकम, विजय शिर्के, निलेश ठाणगे, संजीव राऊत, बाबा शिर्के आणि बि. व्ही. जी. इंडीया ली. कंपनी मधील सर्व कमिटी सदस्य व कामगार उपस्थित होते.